छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरू झाला असून नूतन वर्षाच्या पहिल्या १५ दिवसांतच दागिने हिसकावण्याच्या सहा घटना घडल्या. यामुळे २०२५ चा रेकॉर्ड मागे पडला आहे. उस्मानपुरा, सातारा परिसर टार्गेटवर असताना चोरांनी रामनगर-तोरणागडनगर भागातून आणखी एका महिलेचे ७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. ही घटना २७ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता रामेश्वर कोरडे (३०, रा. श्रीकृष्णनगर, म्हाडा कॉलनी) २७ जानेवारीला सायंकाळी साडेपाचला मुलींना शाळेतून घेऊन पायी निघाल्या होत्या. तोरणागड वॉकिंग ट्रॅकजवळील स्पोर्टस बाईकवरून दोन चोर आले. अनिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील मागच्याने हिसकावले. त्यात एक तुकडा अनितांच्या साडीत अडकला व दुसरा तुकडा चोरांच्या हातात गेला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ करीत आहेत.













